महावितरण आणि अदानी कंपनीच्या विनापरवाना स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न हाणून पाडला

अब्दुल लाट/ प्रतिनिधी 

अब्दुल लाट येथे महावितरण आणि अदानी कंपनीच्या वतीने वीज ग्राहकांच्या परवानगी शिवाय आणि कोणतीही संमती न घेता बळजबरीने स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न आज आंदोलन अंकुश आणि विधायक फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या हाणून पाडला
कंपनीचे कर्मचारी राजेंद्र बैरागी यांच्या झेंडा चौक परिसरातील घरातील मीटर बसवताना लक्षात आले आणि त्यांनी सामाजिक कार्यकर्ते डॉ दशरथ काळे आणि आंदोलन अंकुशचे प्रभाकर बंडगर यांना फोन केला. यावेळी डॉ काळे आणि बंडगर यांनी तत्काळ धाव घेऊन त्या कर्मचाऱ्याला पकडले आणि आपले वरिष्ठ आल्याशिवाय आम्ही हे करून देणार नाही असा पवित्रा घेतला.यावेळी त्या ठिकाणी कंपनीचे   अमन बेडक्याळे आणि इंजिनिअर रोहिदास महादेव माने हे घटनास्थळी आले.याप्रसंगी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेऊन प्रश्नांची सरबत्ती केली आणि बदललेले जुने मिटर बसविल्याशिवाय येथून सोडणार नाही असा सज्जड दम दिला.यावेळी ज्युनिअर इंजिनिअर  रोहिदास माने यांनी आज विनापरवाना बदललेले मीटर तत्काळ बसवून यापुढे अशी कार्यवाही करणार नाही असे कबूल केल्याने आंदोलक शांत झाले.अखेर आज बदललेले जुने 10 मिटर तात्काळ बसवून नवीन मीटर कंपनीने काढून नेले.याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विधायक फाउंडेशनचे डॉ.दशरथ काळे,आंदोलन अंकुशचे प्रभाकर बंडगर यांनी असा प्रकार होत असेल तर ग्राहकांनी विरोध करून संघटनेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.यावेळी शिवसेना तालुका उपप्रमुख डॉ.राजेंद्र बैरागी, प्रकाश बिरनाळे,राहुल तेली,अशोक भागवत,दिलीप बैरागी, रामदास बैरागी,रोहन ठिकणे,महावीर गाडवे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
Spread the love
error: Content is protected !!