कुरुंदवाड / प्रतिनिधी
अब्दुल लाट येथील संगीता सचिन मेथे यांच्या ठेवपावतीवर परस्पर कर्ज काढून आर्थिक फसवणूक झाल्याने तक्रारदार मेथे यांनी कुरुंदवाड पोलिसांत सन्मती सहकारी बॅकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक आप्पासो पाटील, चेअरमन सुनिल पाटील यांच्यासह २४ जणांविरोधात लेखी तक्रार दिली आहे.मात्र तक्रार देवून दीड महिना उलटले तरी पोलिसांनी गुन्हा नोंद केले नसल्याने पोलिस मुख्यालयासमोरच आज गुरुवार दिनांक 22 मे रोजी कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा मेथे कुटुंबियांनी दिला होता.या अनुषंगाने कुरुंदवाड पोलिसांनी गुन्हा बॅकेच्या तळंदगे शाखेत झाल्याने तक्रारदारांचे तक्रार अर्ज हुपरी पोलिस ठाण्याकडे वर्ग केला आहे.शिवाय पोलिसांनी मेथे यांची समजूत काढून हुपरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात येईल,असे आश्वासन दिल्याने आज गुरुवारचे आत्मदहन आंदोलन तात्पुरते स्थगित केले असल्याची माहिती सचिन मेथे यांनी आज गुरुवार दिनांक 22 मे रोजी दुपारी बारा वाजता दिली आहे. संगीता मेथे यांनी २०२० साली पंतप्रधान स्वयंरोजगार योजनेअंतर्गत इंचलकरंजी येथील सन्मती सहकारी बॅकेच्या लाट शाखेतून २४ लाखांचे कर्ज घेतले होते. कर्ज मिळाल्याने मेथे यांनी त्याच शाखेत २१ लाख ५० हजारांचे ठेव पावती केली होती. कोरोनामुळे व्यवसाय अडचणीत आल्याने मेथे यांनी ठेव पावती मोडून कर्जात जमा करून घेण्यासाठी बॅकेचे उंबरठे झिजवले. मात्र, मोठ्या प्रयत्नाने बँकेकडून खातेउतारा मिळविले असता स्वःताच्या ठेवपावतीवर बॅकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांच्या पत्नी अश्विनी अशोक पाटील,पुतण्या,नातलग,मित्रांच्या नावावर कर्ज देवून फसवणूक झाल्याचे तक्रारदारांच्या लक्षात आले.त्यामुळे त्यांनी बॅकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, चेअरमन सुनिल पाटील यांच्यासह अब्दुल शाखेचे शाखाधिकारी,तळंदगे शाखेचे शाखाधिकारी यांच्यासह सर्व संचालक असे एकूण २४ जणांविरोधात येथील पोलिसांत ७ एप्रिल रोजी तक्रार दाखल केली आहे.तक्रादराची ठेव पावती अब्दुललाट शाखेत आणि कर्ज मात्र तळंदगे शाखेतून दिले आहे.कर्ज देताना ठेवदाराने स्वतःच्या नावे स्टॅम्प आणने कायदेशीर बंधनकारक असते मात्र संगीता मेथे यांच्या नावे सुकुमार बेडक्याळे हस्ते स्टॅम्प घेतले आहे.कर्ज प्रकरणावर ही मेथे यांची सही बनावट असल्याचे आरोप मेथे यांनी त्यांचेवर केले आहे.त्यामुळे बॅकेचे अधिकारीसह व्यवस्थापक चांगलेच अडचणीत वाढणार आहेत.तर ठेव पावतीवर सन्मती बँकेकडून फसवणूक झाल्याची तक्रार येथील पोलिस ठाण्यात दिली आहे.कर्जाचा बॅक उतारा पाहीले असता गुन्हा तळंदगे शाखेत झाला आहे. त्यामुळे तक्रार अर्ज हुपरी पोलिस ठाण्यात देण्याचा सल्ला तक्रारदारांना दिला आहे.दरम्यान सन्मती सहकारी बॅकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक आप्पासो पाटील,चेअरमन सुनिल पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.