नागाव फाटा येथील कोल्हापूर स्टील कंपनीसमोर चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक सेवा रस्त्यावर पल्टी होत पार्किंग केलेल्या वाहणास धडक बसल्याने एकजण जखमी
पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नागाव फाटा येथील कोल्हापूर स्टील कंपनीसमोर चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक सेवा रस्त्यावर पल्टी होत पार्किंग केलेल्या वाहणास धडक बसल्याने एकजण जखमी झाला हा अपघात बुधवारी पहाटे ४ वाजण्यासुमार झाला . या अपघाताला संबंधित कंपनी व ठेकेदार जबाबदार असल्याचे घटनास्थळावरून बोलले जात आहे .
सध्या पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून कार्यान्वित कंपनी व ठेकेदारांच्या अनेक चुकांमुळे या रस्त्याचे ठिकठिकाणीने अर्धवट स्वरूपाचे काम पुर्ण करण्याकडे कंपनी व ठेकेदाराचा कल असल्याचा पहावयास मिळत आहे असे काम करत असताना मात्र त्याना दिशा दर्शक किवा साईट बॅरिकेट लावून वहाण चालकाना दिशा व रस्त्यावरील अंदाज येण्यासाठी सुचना करणे बंधनकारक असताना मात्र नागाव फाटा येथे संबंधित कंपनी व ठेकेदाराकडून नियम धाब्यावर बसवल्याने हा अपघात झाला . एम एच ०९ एफ डब्ल्यू १५४६ हा ट्रक राजस्थान येथून ३० टन पार्सल मटेरियल भरून तमिळनाडूकडे जात असताना नागाव फाटा येथे आल्यावर अर्धवट रस्त्यामुळे चालकास अंदाज न आल्याने भरधाव ट्रक हा रस्त्यावर टाकलेल्या खडीच्या ढिगार्यातून जात बाजूस पार्किंगमध्ये उभा असलेल्या एम एच १० डीटी १०३२ या मालवाहतुक गाडीस धडक देवून दोन्ही ही वाहणे पल्टी झाली पार्किंग गाडीत झोपलेला चालक मुस्ताक अहमद इक्बाल पटेल यास जोराचा मार लागल्याने तो जखमी झाला त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे . या अपघातात दोन्ही वाहनाचे लाखोचे नुकसान झाले आहे .