हातकणंगले / प्रतिनिधी
हातकणंगले पंचक्रोशीतील नागरिक, सर्व राजकीय पक्ष आणि माजी सैनिकांनी शहरातील प्रमुख मार्गावरून तिरंगा रॅली काढून भारतीय जवानांना पाठिंबा व्यक्त केला.पहेलगाम भ्याड हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह केंद्र सरकारने पहेलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराला कारवाईचे अधिकार दिले होते. भारतीय लष्कराने याला चोक प्रत्युत्तर देत
आपली श्रेष्ठता सिद्ध केली होती. भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईमुळे भारतवाशियांच्या मध्ये आनंद निर्माण झाला होता.भारतीय लष्कराला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी हातकणंगलेसह पंचक्रोशीतील सर्वपक्षीय नागरिकांनी, आणि माजी सैनिकांनी शहरातील प्रमुख मार्गावरून तिरंगा रॅली काढली. या रॅलीला दर्गा चौकातून सुरुवात झाली. रॅलीचे उद्घाटन सुभेदार मेजर माणिक पांडव,सुभेदार शिवाजी चव्हाण,हवालदार दादासो पवार, हवालदार श्रीपती कोळी यांच्या हस्ते करण्यात आले. जय जवान जय किसान, भारत माता की जय, वंदे मातरम, हम सब एक है च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी तिरंगा रॅलीमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी,माजी सैनिक तसेच अमर इंगवले ,शीतल हावळे, अमर इंगवले, बाबासाहेब पाटील कुंभोज, सुदेश मोरे, दीपक वाडकर, दीनानाथ मोरे, उमेश सूर्यवंशी, संतोष कांबळे रमजान मुजावअमर इंगवले: सैनिक शिवाजी चव्हाण,पांडव माणिक, विजय खोत, विजय निबाळकर, अभी लुगडे, अमर इंगवले: मिलिंद चौगुले, रावसो चौगुले, अण्णासाहेब पाटील चौगुले,सुभाष मोरे,