शिरोळात आज्ञातांकडून धारदार शस्त्राने मजुराचा निर्घृण खून 

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ-कनवाड या रस्त्यावरील आण्णासो तुकाराम महात्मे यांच्या रस्त्यालगतच्या शेतात सुरू असलेल्या बांधकामावर अज्ञातांकडून धारदार शस्त्राने राजू दिलीप कोलप ( वय अंदाजे ४० वर्षे) रा. निलजी बामणी ता. मिरज जिल्हा सांगली या मजुराचा निर्घृणपणे खूण करण्यात आल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत शिरोळ पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा व फॉरेन्सिक पथकाची तपासणी सुरू होती.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की. शिरोळ-कनवाड रस्त्यावरील आण्णासो महात्मे यांच्या शेतात घराचे बांधकाम सुरू आहे. बांधकामासमोर त्यांचा जनावरांचा गोठा आहे. सोमवारी सायंकाळी महात्मे कुटुंबातील व्यक्ती जनावरांचे चारापाणी करण्यासाठी गेले होते. यादरम्यान त्यांना बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी एक व्यक्ती झोपल्याचे दिसून आले. त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता. सदर व्यक्तीच्या अंगावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती त्यांनी तात्काळ शिरोळ पोलीस ठाण्यास दिली. शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड हे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या समवेत घटनास्थळी पोहोचले. या घटनेची चौकशी करीत असताना. सदर मृत व्यक्ती ही येथील माने यांच्या वीट भट्टीवर गाढवाने वीट वाहून नेणारे ठेकेदार महादेव यांच्याकडे काम करणारा राजू दिलीप कोलप असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता राजू कोलप हा रविवारी रात्री आठ वाजेपर्यंत वीट भट्टीवर होता त्यानंतर तो तेथून निघून गेला होता. रविवारी रात्री अज्ञात्यानी कोणत्या तरी अज्ञात कारणावरून राजू घोलप याचा धारदार शस्त्राने खून केला आहे. असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. राजू यांच्या डोक्यावर, छातीवर, डाव्या हातावर धारदार शस्त्राने वर्मी घाव घातल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

दरम्यान सोमवारी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळाचा पोलिसांकडून पंचनामा सुरू होता. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ रोहिणी सोळंके यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासा संदर्भात आवश्यक त्या सूचना दिल्या. खुनाची बातमी समजतात घटनास्थळी बघ्याची मोठी गर्दी झाली होती.

Spread the love
error: Content is protected !!