पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे
तावडे हॉटेल येथे बसमध्ये चढत असताना चोरट्याने सुमारे साडे तीन तोळे लंपास केले.हि घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तावडे हॉटेल येथे घडली.शिरोली एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मेघा संदीप मनाडे रा.तावडे हॉटेल- गांधीनगर रोड,मनाडे मळा,गांधीनगर या उन्हाळी सुट्टीसाठी आपल्या मुलीसोबत माहेरी इचलकरंजीला निघाल्या होत्या.एसटी बसला गर्दी असल्याने त्यांनी पर्समध्ये आपले दागिने ठेवले होते.त्या तावडे हॉटेल येथे आल्यानंतर कोल्हापूर इचलकरंजी एसटी बसमध्ये चढल्या.बस पंचगंगा पुलापर्यंत गेली असता त्यांना पर्सची चेन उघडी असल्याचे निदर्शनास आली.त्यांनी पर्समध्ये पाहिले असता आपले दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ बसमधील प्रवाशांना विनंती केली की,दागिने कोणी घेतले असतील तर परत द्यावेत. पण कोणीही कबुल झाले नसल्याने त्यांनी बस शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशनला आणली.तेथे पोलिसांनी सर्व प्रवाशांची झडती घेतली.पण दागिने मिळुन आले नाहीत.याबाबतची फिर्याद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.