पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोलीत पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेवून आठ जणांना गंभीर जखमी केले आहे. हि घटना शुक्रवारी दुपारी बारा ते सायंकाळी पाच या वेळेत घागरीवाले वसाहत व येळापुरे गल्लीत घडली.जखमींमध्ये लहान सहा मुलांचा,एक तरुण व एक वयोवृद्ध महिलेचा समावेश आहे. पुलाची शिरोलीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ.जे.जे.अँड्रोस यांनी प्राथमिक उपचार करून कोल्हापुरातील सरकारी दवाखान्यात सर्व जखमींना पुढील उपचारासाठी दाखल केले आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी वीर सावरकर नगर येथील घागरीवाले वसाहतीत पिसाळलेले कुञे आले.त्याने गल्लीत खेळत असलेल्या लहान मुलांना चावा घेण्यास सुरुवात केली. यामध्ये त्या कुञ्याने दिसल त्याला चावा घेतला.यामध्ये चेहऱ्यावर, हाता पायावर, पोटावर,मानेवर चावा घेवून तर कांही जणांचे लचके तोडून गंभीर जखमी केले.त्यानंतर त्या कुञ्याने येळापुर गल्लीतील दोन लहान मुलांचा चावा घेवून गंभीर जखमी केले.त्यानंतर स्थानिक नागरिकांनी पाठलाग करुन त्या कुञ्याला ठार मारले.जखमींना तत्काळ शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले यावेळी वैदिकीय अधिकारी डॉक्टर जेसी का यांनी जखमेवर तातडीचे औषध उपचार करून सर्व गंभीर रुग्णांना कोल्हापुरातील सरकारी दवाखान्यात पुढील उपचारासाठी पाठविले या पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेण्याची ही शिरोलीतील अलीकडील काही महिन्यातील तिसरी घटना घडली आहे.कादीरा डांगे वय ६,आयत अल्ताफ खान वय ५, अदनान गवंडी वय ४, मारुती कोंडापल्ली वय ५, सलोनी कुमारी वय ४,शरण्या गोलकर वय ३, सर्जेराव शिंदे वय ३३, अंजुबाई कांबळे वय ६०,या सर्व जखमींवर कोल्हापूरातील सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.