पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथील समता शिक्षण प्रसारक मंडळ शिरोली पुलाची संचलित कै रा .म. महाडिक हायस्कूल चा फेब्रुवारी – मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी.परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे .गोरगरीब कामगार व मोलमजुरी करणाऱ्या पालकांच्या मुलानी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे
प्रथम क्रमांक तनुजा काशिलिंग गावडे.
द्वितीय क्रमांक गोरख लक्ष्मण एडवे .
तृतीय क्रमांक सुशील गजानन कानडे .
चतुर्थ क्रमांक शिवानी राम आधार राजभर .
असे गुणानुक्रमे क्रमांक असून या सर्वांनी शैक्षणिक जीवनात खडतर प्रवास करून हे लखलखीत यश प्राप्त केले आहे यामध्ये शिवानी राजभर या विद्यार्थिनीचे वडील अपघातात निधन पावले आहे आई मोलमजुरी करते. एमआयडीसी मधील कामगारांच्या मुलांनी मिळविलेले हे यश प्रेरणादायी आहे शाळेतील सर्व मुलांना संस्थेने कपडे पुस्तके वह्या बस सेवा मोफत पुरविलेली आहे त्याचे खऱ्या अर्थाने सार्थक झाल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कौंदाडे यांनी गौरवोद्गार काढले आहेत.सदर विद्यार्थ्यांना शाळेचे प्रशासन प्रमुख एस.डी.लाड, मुख्याध्यापिका प्राजक्ता ओऊळकर, पर्यवेक्षिका प्रियांका लाड, सहाय्यक शिक्षिका जयश्री तिरपणे,लक्ष्मी गावडे, शाहीन बागवान, स्वप्नाली जाधव व इतर शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले तर संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कौंदाडे , उपाध्यक्ष बाबासाहेब गुरव, संचालक दिग्विजय कौंदाडे , धीरज पाटील,सागर कौंदाडे, शंकर पाटील, रघुनाथ कौंदाडे,सुजय गुरव यांचे प्रोत्साहन मिळाले