थंडीत हातपाय दुखतात तर मग हा आयुर्वेदिक सल्ला पहायचं

आमवात (Rheumatoid Arthritis)
आम म्हणजे विषारी पदार्थ.शरीरामध्ये विषारी पदार्थ साठत जातात व ते बोटांच्या पेरामध्ये,गुडघ्यामध्ये साठत जातात, विशेषतःलहान सांध्यांमध्ये सूज व वेदना वृश्चिक दंशवत वेदना असतात त्यालाच “आमवात “म्हणतात.

कारणे –
पचण्यास अतिजड पदार्थ सतत खाणे,नॉनव्हेज,दुधाचा व त्याचे पदार्थाचे अति सेवन,अयोग्य आहार
विहार,अयोग्य दिनचर्या, जेवण झाल्या झाल्या लगेचच कष्टाची कामे करणे.
तपासणी -RA

लक्षणे –
रुग्णांना सकाळ सकाळी उठायला नको होणे,बारीक ताप असणे,पोट साफ न होणे,लहान सांध्यांची हालचाल न होणे.बोटे वाकडी होणे,त्यांची स्थाने -बोटांची पेरे,मनगट, कोपरा,गुडघा

आयुर्वेदिक औषध –
आमवातारी रस,गुडूच्यादी घनवटी,वात कफ नाशक चिकित्सा,वमनादी पंचकर्म,चिंचा लवण तेलाची बस्ती,शंख वटी,लसूनादी वटी.

उपाय –
(1)एरंडेल तेलाचे नित्य सेवन
(2)काळ्या वाळूचा शेख दिवसातून 2वेळेस घेणे
(3)आहारामध्ये सुंठ,लसूण,ओवा वापर करणे.
(4)पारिजातकाचा काढा करून पिणे
(5)सुंठ,जायफळ,वेखंड समप्रमाणात घेऊन यांचा लेप रात्री लावणे व सकाळी कोमट पाण्याने धुऊन घेणे.
(6)जेवण झाल्या झाल्या लगेचच अतिश्रमाची कामे न करणे.
(7)रक्त मोक्षण चिकित्सा

अपथ्य (काय खाऊ नये )-

पचणास असे जड पदार्थ,मसालेदार तेलकट पदार्थ,दही, बासुंदी,श्रीखंड,आम्रखंड,नॉनव्हेज,हरभरा,पावटा,वरणा, बटाटा,रताळी,फणस,फ्रिज मधील अन्न,कोल्ड्रिंक,उडदाचे पदार्थ,सलाड,पापड,लोणचे,कच्चे अन्न

पथ्य (काय खावे )-

दुधीभोपळा,पडवळ,दोडका,मध,कारले,राजगिरा लाडू, ज्वारीच्या लाह्या,ज्वारीच्या कन्या,कोमट पाणी,लिंबू,भेंडी, गवारी,ढबू मिरची,ताक,मूग डाळ,वांगी,ज्वारीची भाकरी,बिन पॉलिशचाभात,संधव मीठ (उपवासाचे मीठ)

अधिक संपर्कासाठी
डॉ.ओंकार अशोक निंगनुरे.
संपर्क -9175723404,7028612340

Spread the love
error: Content is protected !!