हातकणंगले / प्रतिनिधी
८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण असा बाळकडू पाजून हिंदूहृदयसम्राट कै.बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हा शिवसैनिकाना सक्षम केले.त्याचाच वारसा आम्ही शिवसैनिक चालवत आहोत.शिवसैनिकांची खरी कदर करणारा माणूस म्हणून मा.मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे पाहिले जाते. याच्यात माध्यमातून वैशिष्ठपूर्ण योजने अंतर्गत तब्बल दहा कोटीचा निधी मंजूर करून आणला आहे असे मत माजी जिल्हाप्रमुख व गोकूळ दुध संघाचे संचालक मुरलीधर जाधव यांनी व्यक्त केले.
नगरविकास विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व संसदरत्न खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने व गोकूळचे संचालक मुरलीधर जाधव यांच्या प्रयत्नातून शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते मधूकर परीट व नगरसेवक विजय खोत यांनी हातकणंगले नगरपंचायतीस मंजूर करून आणलेल्या दहा कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बोलताना माजी जि.प.सदस्य अरुण इंगवले म्हणाले ,या विकास कामाच्या माध्यमातून हातकणंगले मध्ये विकासाचे नवे पर्व सुरु झाले आहे.त्यामुळेच एकनाथ शिंदेच्या माध्यमातून तब्बल दहा कोटींची निधी आणणाऱ्या मुरलीधर जाधव यांचे कौतूक संपूर्ण गाव करीत आहे.नगरपंचायत झाल्यामूळे टिका करणारे आत्ता मुकाट्याने गप्प बसतील कारण विकासांची गंगा आता हातकणंगले मध्ये वाहू लागली आहे.
यावेळी अविनाश बनगे,शिवाजी जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत प्रस्ताविक राजू इंगवले यांनी केले. आभार विजय खोत यांनी मानले तर सूत्र संचालन अतूल मंडपे यांनी केले.यावेळी गावातील विकास कामासाठी तब्बल दहा कोटी रुपयांचा निधी आणणाऱ्या मधूकर परीट आणि विजय खोत यांचा गावच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास मा. जि.प. सदस्य अरुण पाटील , माजी नगराध्यक्ष अर्चना जानवेकर , माजी सरपंच संदीप कांरडे , गुंडोपत इरकर , अमर इंगवले ,’ दिपक वाडकर ,सुभाष मोरे , अभि लुगडे , भाजपाचे सर्व नगरसेवक , विजय चौगुले , पंडीत निंबाळकर , सौ पुनम परीट , मा. सरपंच सौ. प्रांजली निंबाळकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.
चौकट
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हातकणंगले साठी दिलेल्या तब्बल दहा कोटीचा निधीचा शुभारंभ झाला. मात्र यावेळी त्याच्यात पक्षात प्रवेश केलेले शिवसेनेचे गटनेते व सर्व नगरसेवक अनुपस्थितीत होते यांची चर्चा परिसरात सुरु होती.
चौकट – –
हातकणंगले नगरपंचायतीसाठी तब्बल दहा कोटीचा निधी खेचून आणला मात्र या कार्यक्रमाला मुख्याधिकारी , बांधकाम अभियंता , आणि पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता गैरहजर राहीलेची खंत अरुण इंगवले यांनी सर्वसमोर व्यक्त केली .