इचलकरंजी / प्रतिनिधी
तारदाळ येथील अवधूत संजय जाधव (वय 29) या युवकाचा गोवा येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे.अवधूत जाधव हा कामानिमित्त गोवा येथे वास्तव्यास होता. रविवारी मध्यरात्री काम आटोपून आपल्या कारमधून तो घरी जात असताना मडगाव येथे समोरून येणाऱ्या वाहनाच्या तीव्र प्रकाशझोतामुळे जाधव याचे डोळे दिपले आणि अवधूत याची गाडी रस्त्याकडेच्या झाडावर आदळली.यामध्ये तो गंभीर जखमी झाला. अवधूत याला साऊथ मडगाव डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.अवधूत याच्या पश्चात अडीच वर्षाचा लहान मुलगा,पत्नी,वडील व भाऊ असा परिवार आहे. अवधूत हा माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे स्वीय सहाय्यक संजय जाधव यांचा मुलगा होता.