गेली पाच दिवस भारत पाकिस्तान दरम्यान युद्ध सुरू असून केंद्र सरकारने सर्व जवानांच्या सुट्या रद्द केल्यामुळे सुट्टीवर एक – दोन दिवस आलेल्या जवानांना रेल्वेमध्ये तिकीट उपलब्ध नसले तरी जवान जनरल डब्यातून देशसेवा करण्यासाठी मिळेल त्या गाडीने जात आहेत.केंद्र सरकारने या काळात या जवानांची सोय म्हणून सर्व गाड्यामध्ये प्राधान्याने जादा आरक्षण राखीव ठेवणे गरजेचे होते.मात्र केंद्र सरकारने जवानांच्या ऐवजी क्रिक्रेटपट्टूंची लाड करत वंदे भारत या विशेष ट्रेनने त्यांना दिल्लीला आणले.ज्या तत्परतेने सरकारने क्रिक्रेटपट्टूंची सोय केली त्याच तत्परतेने जवानांचीही व्यवस्था करण्याचे औदार्य दाखवावे अशी संताप जनक प्रतिक्रिया माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज रविवार दिनांक 11 मे रोजी सकाळी 9 वाजता बोलताना व्यक्त केली आहे.शेट्टी पुढे म्हणाले
गेल्या तीन ते चार दिवसापासून अनेक रेल्वे अधिकारी याबाबत पाठपुरावा करत आहेत.मात्र रेल्वे मंत्रालयाने ही बाब अजूनही गांभीर्याने घेतले नाही.पाकिस्तानी हल्ल्यामुळे 8 मे रोजी धरमशाला येथे सुरू असलेला पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघातील IPL सामना रद्द करण्यात आला होता.त्यानंतर खेळाडूंना आणि IPL कर्मचाऱ्यांना सुरक्षितरीत्या दिल्लीत आणण्यासाठी ‘वंदे भारत’ या विशेष ट्रेनचे आयोजन केले होते.अशात खेळाडूंना या ट्रेनमधून आणतानाचा व्हिडिओन सोशल मीडियावर शेअर झाला असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.