हा व्हिडीओ पहा
सदलगा / प्रतिनिधी अण्णासाहेब कदम
बेळगाव जिल्ह्यातील निपाणी व चिकोडी हे दोन तालुके पूर्वीपासूनच तंबाखू पिकासाठी सुपरिचित आहेत.या दोन्ही तालुक्यांना पूर्वीपासून तंबाखूचे आगार समजले जायचे,परंतु नंतर कालांतराने दूधगंगा नदीच्या पाण्याची उपलब्धतेमुळे
उसाच्या पिकाचे जोमाने आगमनान झाले आणि तंबाखू व ज्वारीकडे थोडे दुर्लक्ष झाले होते.परंतु यावर्षी न परवडणारा उसाचा दर १२ ते १४ महिने उसाचे पीक आणि भविष्यातील पाण्याचा तुटवडा यामुळे या दोन तालुक्यातील शेतकरी ऊसाला
पर्याय पीक म्हणून तंबाखू व ज्वारी आणि इतर पिकाकडे वळला आहे.यावर्षी तंबाखू पीक लागणीला अत्यंत पोषक वातावरण लाभल्याने रोपांची जोमाने वाढ होत असून, रोगराईचे प्रमाण देखील फारच कमी आहे.त्यामुळे यावर्षी तंबाखूचे पीक
बंपर येणार की काय? अशी स्थिती निपाणी- चिकोडी तालुक्यात निर्माण झाली आहे. एकंदरीत प्रत्येक वर्षापेक्षा यावर्षी सरासरी ३५ ते ४० टक्के तंबाखू पिकाचे क्षेत्र लागणी खाली असल्याचे चित्र दिसत आहे. पिकाची स्थिती योग्य असल्याने उत्पादक शेतकरी आनंदात आहेत.
सुदैवाने यावर्षी जर चांगला दर उत्पादित तंबाखू पिकास मिळाल्यास ऊसाला पर्याय पीक म्हणून तंबाखू कडे शेतकरी वळतात की काय? अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. एकंदरीत चिकोडी निपाणी या दोन तालुक्यातील तंबाखू पिकाची स्थिती अत्यंत चांगली असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.