शिरोळ तालुक्याला ६२ कोटीचा निधी मंजूर – आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर

जयसिंगपूर / प्रतिनिधी

राज्य विधिमंडळाचे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य शासनाच्या विविध विभागाच्या विकास कामासाठीच्या पुरवणी मागण्याचा प्रस्ताव अधिवेशनात मंजूर करण्यात आला.यामध्ये शिरोळ तालुक्यातील राज्य व प्रमुख

जिल्हा मार्ग मजबुतीकरण व अंतर्गत गटर्स कामासाठी ४५ कोटी तसेच दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारत बांधकांमासाठी १६ कोटी व शशिकला क्षयरोग आरोग्यधाम, जयसिंगपूर येथे संरक्षक भिंत्त (कंपाउंड) साठी १ कोटी रुपये असे एकूण ६२

कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी दिली.
शिरोळ तालुक्यातील राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्याचे मजबुतीकरण व अंतर्गत गटर्स करणे तसेच दत्तवाड ग्रामीण

रुग्णालयाचे बांधकाम अत्यंत जीर्ण झाले होते व त्यापासून रुग्णांना व कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या त्यामुळे नागरिक व कर्मचाऱ्यांची गेली अनेक दिवस नवीन इमारत बांधकामासाठी वारंवार मागणी होती, तसेच शशिकला

क्षयरोग आरोग्यधाम,जयसिंगपूर येथील संरक्षक भिंत बांधणे कामीही मागणी होती त्यामुळे आपण राज्य शासनाकडे या सर्व कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. या हिवाळी अधिवेशनात या सर्व कामांना निधी मंजूर करण्यात यश आले

तसेच या कामी राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे सहकार्य मिळाले आहे.शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकास कामासाठी यापूर्वीही मोठ्या

प्रमाणात निधी मिळाला होता.पुढील काळात देखील तालुक्यातील जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करताना विकास कामासाठी शासनाच्या माध्यमातून आणखी मोठ्या प्रमाणात निधी आणणार आहोत असेही आमदार राजेंद्र पाटील (यड्रावकर)यांनी सांगितले.

चौकट
दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत बांधकामासाठी दि.१३ मार्च २०२३ रोजी प्रस्ताव दिला होता,त्यानंतर दि.२३ ऑगस्ट २०२३ रोजी या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली होती व चालू हिवाळी अधिवेशनात या ग्रामीण रुग्णालयाच्या नविन इमारत बांधकामासाठी निधी मंजूर झाला.

त्यामुळे आता दत्तवाड ग्रामीण रुग्णालय रु.१६.४० लाख रुपयांची सुसज्ज अशी नवीन इमारत मिळणार आहे त्यामुळे अनेक वर्षाच्या मागणीची पूर्तता करणेत आली याचे समाधान आहे,असे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले

सोबत – मंजूर रस्त्यांची यादी

1. कराड कुंडल सांगली अंकली जयसिंगपूर शिरोळ रस्ता रामा 153 ला मिळणारा रामा क्र. 142 कि.मी. 1/900 ते 2/200 दरम्यान आर.सी.सी. गटर्स करणे ता. शिरोळ जि. कोल्हापूर (भाग- जे. जे. मगदूम कॉलेज ते बियाणी पेपर जयसिंगपूर) 1 कोटी
2. जयसिंगपूर शहराबाहेरील वळण मार्ग रामा क्र. 176 उदगाव रामा क्र. 142 ते प्ररामा क्र. 6 ला मिळणारा रस्ता रामा क्र. 176 कि.मी. 0/00 ते 1/600 मध्ये गटर्स करणे ता. शिरोळ जि. कोल्हापूर (भाग उदगाव ते मदरसा उदगाव) 1 कोटी 50 लाख
3. 2. जयसिंगपूर शहराबाहेरील वळण मार्ग रामा क्र. 176 उदगाव रामा क्र. 142 ते प्ररामा क्र. 6 ला मिळणारा रस्ता रामा क्र. 176 कि.मी. 1/500 ते 3/300 मध्ये रुंदीकरणासह सुधारणा करणे ता. शिरोळ जि. कोल्हापूर (भाग उदगाव ते के.पी. टी. ) 5 कोटी
4. निढोरी गोरंबे कागल सांगाव यळगुळ शिरदवाड लाट हेरवाड रस्ता रामा क्र. 195 कि.मी. 55/500 ते 58/00 चे मजबुतीकरणासह आर.सी.सी. गटर्स करणे ता. शिरोळ जि. कोल्हापूर (भाग अ लाट ते हेरवाड 2 कोटी 50 लाख
5. रामा प्रचार ते संभापूर तासगाव कुंभोज दानोळी जयसिंगपूर रेल्वे स्टेशन ते प्ररामा क्र. 6 पर्यंत रामा क्र. 199 कि.मी. 45/00 ते 47/00 मजबुतीकरणासह आर.सी.सी. गटर्स करणे ता. शिरोळ जि. कोल्हापूर (भाग दानोळी ते जैनापुर) 2 कोटी 50 लाख
6. कराड कुंडल सांगली अंकली जयसिंगपूर शिरोळ रस्ता रामा 153 ला मिळणारा रामा क्र. 142 कि.मी. 3/500 ते 7/500 ची सुधारणा करणे ता. शिरोळ जि. कोल्हापूर (भाग- के.पी. टी.) 3 कोटी 50 लाख
7. प्ररामा क्र सहा पासून अतिग्रे कबनूर इचलकरंजी टाकवडे शिरढोण मजरेवाडी अकिवाट टाकळी खिद्रापूर रस्ता रामा क्र. 200 कि.मी. 23/500 ते 25/600 ची मजबुतीकरणासह सुधारणा करणे ता. शिरोळ जि. कोल्हापूर (भाग शिरढोण ते कुरुंदवाड) 3 कोटी 50 लाख
8. प्ररामा क्र. 6 पासून अतिग्रे कबनूर इचलकरंजी टाकवडे शिरढोण मजरेवाडी अकिवाट टाकळी खिद्रापूर रस्ता रामा क्र. 200 कि.मी. 36/00 ते 38/500 ची रुंदीकरण व गटर चे बांधकाम करणे ता. शिरोळ जि. कोल्हापूर (भाग टाकळी ते खिद्रापूर) 3 कोटी 50 लाख
9. प्ररामा क्र. 6 पासून अतिग्रे कबनूर इचलकरंजी टाकवडे शिरढोण मजरेवाडी अकिवाट टाकळी खिद्रापूर रस्ता रामा क्र. 200 कि.मी. 38/500 ते 40/00 ची रुंदीकरण व गटरचे बांधकाम करणे ता. शिरोळ जि. कोल्हापूर (भाग टाकळी ते खिद्रापूर) 3 कोटी 50 लाख
10. रामा क्र.4 ते संभापूर तासगाव कुंभोज दानोळी जयसिंगपूर रेल्वे स्टेशन ते प्ररामा क्र. 6 पर्यंत रामा क्र. 199 कि.मी. 45/00 ते 47/00 मजबुतीकरणासह आर.सी.सी. गटर्स करणे ता. शिरोळ जि. कोल्हापूर (भाग दानोळी ते जैनापुर) 2 कोटी 50 लाख

1. रामा क्र 192 पासून हातकणंगले नेज कुंभोज हिंगणगाव कवठेसार प्रजिमा क्र. 16 किमी 12/00 ते 14/00 आर.सी.सी. गटर्स करणे ता. शिरोळ जि. कोल्हापूर (भाग कवठेसार गाव) 5 कोटी
2. जयसिंगपूर रेल्वे स्टेशन उदगाव चिंचवड अर्जुनवाड घालवाड शिरटी शिरोळ रस्ता प्रजिमा क्र. 14 रस्ता कि.मी. 9/00 ते 11/00 मध्ये रुंदीकरणासह सुधारणा व आर.सी सी गटर्स करणे ता. शिरोळ जि. कोल्हापूर (भाग अर्जुनवाड ते घालवाड) 2 कोटी 50 लाख
3. कबनूर गंगानगर यड्राव जांभळी हरोली नांदणी धरणगुत्ती शिरोळ रस्ता प्रतिमा क्र. 31 कि.मी. 17/00 ते 19/00 दरम्यान आर.सी.सी. गटर्स बांधकाम करणे ता. शिरोळ जि. कोल्हापूर (भाग शिरोळ गाव) 1 कोटी 50 लाख
4. अब्दुललाट लाटवाडी घोसरवाड दत्तवाड दानवाड प्रजिमा क्र. 32 किमी 11/00 ते 14/00 चे मजबुतीकरणासह आर.सी.सी गटर्स करणे ता. शिरोळ जि. कोल्हापूर (भाग दतवाड ते दानवाड) 2 कोटी 50 लाख
5. रामा क्र. 200 पासून टाकळी टाकळीवाडी दत्तवाड ते राज्य हद्दीपर्यंत रस्ता प्रजीमा क्र 38 किमी 5/500 ते 7/800 ची सुधारणा करणे व गटर्स बांधणे ता. शिरोळ जि. कोल्हापूर (भाग दतवाड गाव) 1 कोटी 50 लाख
6. अब्दुललाट लाटवाडी घोसरवाड दत्तवाड दानवाड प्रजिमा क्र. 32 किमी 11/00 ते 14/00 चे मजबुतीकरणासह आर.सी.सी गटर्स करणे ता. शिरोळ जि. कोल्हापूर (भाग अ.लाट ते नदीकडे जाणारा टाकवडे रस्ता ) 2 कोटी 50 लाख
7. जयसिंगपूर रेल्वे स्टेशन उदगाव चिंचवड अर्जुनवाड घालवाड शिरटी शिरोळ रस्ता प्रजिमा क्र. 14 रस्ता कि.मी. 25/00 ते 26/400 मध्ये रुंदीकरणासह सुधारणा करणे ता. शिरोळ जि. कोल्हापूर (भाग हसुर ते शिरटी ) 1 कोटी 50 लाख
8. जयसिंगपूर रेल्वे स्टेशन उदगाव चिंचवड अर्जुनवाड घालवाड शिरटी शिरोळ रस्ता प्रजिमा क्र. 14 रस्ता कि.मी. 3/820 ते 6/200 मध्ये रुंदीकरणासह सुधारणा करणे ता. शिरोळ जि. कोल्हापूर (भाग उदगाव ते चिंचवाड ) 3 कोटी 50 लाख

Spread the love
error: Content is protected !!