शिरोळ / प्रतिनिधी चंद्रकांत भाट
ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नुरखान बादशहा उरुसानिमित्त शुक्रवारी घेण्यात आलेल्या एकतारी भजनी स्पर्धेत माता संतुबाई भजनी मंडळ काननवाडी व चिंतामणी भजनी मंडळ आरग यांना विभागून प्रथम देण्यात आला त्यांना
प्रथम क्रमांकाचे ११ हजार रुपयाचे पारितोषीक विभागुन देण्यात आले.तर मानाचे चषक ट्रॉफी दोन्ही मंडळात नाणेफेक करून वरती माता संतुबाई भजनी मंडळ काननवाडी यांना देण्यात आली.श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह
उरुसानिमित्त शुक्रवारी सायंकाळी एकतारी भजनी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते रात्री उशिरापर्यंत ही स्पर्धा सुरू होती.स्पर्धेत द्वितीय क्रमांक ७ हजार रुपये,ओमगणेश भजनीमंडळ आरळहट्टी,तृतीय क्रमांक ५ हजार रुपये गिरलिंग
भजनीमंडळ कुटकुळी,चतुर्थ क्रमांक ३ हजार रुपये
बसवेश्वर भजनीमंडळ खंडेराजुरी,तर पाचवा क्रमांक अवधुत आखाडा इंचलकरंजी व सचिदानंद भजनीमंडळ वाघवे यांना २हजार रुपयाचे पारितोषिक विभागून देण्यात आले.उपस्थित
मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा पार पडला या स्पर्धेत १६ संघानी सहभाग नोंदविला होता.यावेळी युवा नेते पृथ्वीराज यादव,विजय आरगे,दत्तचे संचालक दरगू गावडे,रावसाहेब देसाई,माजी सरपंच गजानन संकपाळ,धनाजीराव पाटील – नरदेकर,बाळसाहेब कोळी,बापूसो गंगधर,माजी नगरसेवक पंडीत
काळे,भगवान आवळे,दिलीप संकपाळ,पंडीत चुडमुंगे,वसंत चुडमुंगे,राजेंद्र खटावकर,नंदकुमार सुतार,सिताराम संकपाळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.दत्तात्रय गंगधर,शिवाजी जाधव (कवी)विश्वास चुडमुंगे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
युवा नेते पृथ्वीराज यादव माजी ग्रामपंचायत सदस्य विजय आरगे निळकंठ उर्फ पिंटू फल्ले बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूस संयोजन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब जगदाळे,उपाध्यक्ष संतोष विटेकरी,खजिनदार राहुल कोळी,सचिव किरण जगताप,ऑडिटर पिराजी जयान्नावर,
स्वागताध्यक्ष पिराजी हेरवाडे,कार्याध्यक्ष संतोष घाडगे,संयोजक लखन कुंभार,सहसंयोजक सागर कांबळे,सहस्वागताध्यक्ष संजय जगदाळे,सहकार्याध्यक्ष संदीप कोळी,सहखजिनदार कुमार जयान्नावर,नितीन कोळी,सहऑडिटर प्रताप जगदाळे,सहसचिव गणेश मोरे यांच्यासह पवनपुत्र तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य मार्गदर्शक कार्यकर्ते उपस्थित होते.