कवठेसार येथे मुस्लिम ओबीसी वर्धापनदिनानिमित्त लघु उद्योगासाठी मार्गदर्शन शिबिर

कवठेसार / प्रतिनिधी

ऑल इंडिया मुस्लिम ओ बी सी ऑर्गनायझेशनच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त कवठेसार(ता शिरोळ)येथील बशीर फकीर यांचा फार्म हाऊसवर लघु उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले.यावेळी अध्यक्षीय भाषणात

ऑर्गनायझेशनचे पश्चिम महाराष्ट्रचे उपाध्यक्ष व कवठेसारचे माजी सरपंच बशीर फकीर म्हणाले,ऑल इंडिया मुस्लिम ओ बी सी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीरभाई अन्सारी यांच्या अथक

प्रयत्नांतून 1994 साली या मुस्लिम ओबीसी संघटनेला शासकीय मान्यता मिळाली,त्यामुळे मुस्लिम समाजाला व अन्य ओबीसी घटकांना राजकीय व शैक्षणिक आणि नोकरी संदर्भात

विशेष फायदा झाला.याकाळात त्यांना साथ देणारे दिलीप कुमार,कपिल पाटील आणि महाराष्ट्राचे मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष मुसा मुर्शद यांचे मोठे योगदान आहे.यावेळी ओबीसी महामंडळाचे दिपक शिंदे,संत रोहिदास

महामंडळाचे विश्वास करंबे,महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळयांचे नियाज मुल्ला यांनी विविध उद्योग सुरू करण्यासाठी शासकीय आर्थिक मदत कोणत्या प्रकारे घेता येईल याविषयी मार्गदर्शन केले.दरम्यान शिरोळ तालुका वेलफेअर

रिपोर्टर संघटनेच्या खजिनदारपदी संदीप नांद्रेकर यांची,तर ऑल इंडिया ओ बी सी ऑर्गनायझेशनचे कवठेसारचा शहर अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते जमीर फकीर यांची निवड झाले बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी स्वागत बशीर

फकीर,प्रास्ताविक डॉ एम जी बागवान तसेच एम आय एम चे जिल्हा अध्यक्ष इम्रान सनदी, गौरवाडचे असलम मुल्ला कवठेसारचे सरपंच पोपट भोकरे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अरमान मुजावर व अन्सार पटेल आणि आभार

जिल्हा उपाध्यक्ष जमाल फकीर यांनी मानले.यावेळी कवठेसार गावचे माजी सरपंच सुभाष पाटील,बाळासो कुरणे,जिल्हा अध्यक्ष इम्तियाज पठाण,उपाध्यक्ष जमाल फकीर,आलम मुलांनी,तालुका अध्यक्ष युनूस हसुरे,उपाध्यक्ष अरमान

मुजावर,सरचिटणीस मीयाखान मोकाशी,दाऊत मुलांनी,मुन्ना नदाफ,दादासो पाटील(डबल ट्रॅक्टर),रमेश मगदूम,विकास सुतार,सुरेश पाटील, पवन संकपाळ,दिपक संकपाळ तसेच

शिरोळ तालुक्यातील ओबीसी संघटनेचे विविध गावातून आलेले कार्यकर्ते आणि पदाधिकारी व कवठेसार गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!