निमशिरगाव येथे स्वदेशी प्रेरणा दिनाचे आयोजन

जयसिंपुर / प्रतिनिधी

स्वदेशी,स्वावलंबन आणि स्वाभिमानी भारतासाठी आपले प्राण अर्पण करणारे वैज्ञानिक,स्वदेशी चळवळीचे प्रखर कार्यकर्ता व वक्ता,आजादी बचाओ आंदोलना तसेच भारत स्वाभिमान आंदोलनाचे संस्थापक राष्ट्रीय सचिव व मेकॉले शिक्षणपद्धती,ब्रिटिश न्याय व्यवस्थांच्या दुष्परीणामांची व महर्षी वाग्भट रचित अष्टांग हृदयं आणि अष्टांग संग्रहम,देशी गाय,नैसर्गिक शेती,विदेशी काळाधन,भोपाळ गॅस हत्याकांड बद्दल समाजमध्ये सर्व प्रथम माहिती देणारे व जागृती आणणारे हुतात्मा भाई राजीवजी दिक्षित यांच्या १३ व्या पुण्यतिथी निमित्त स्वदेश स्वाभिमानी चिंतन आणि हुतात्मा राजीव भाई दिक्षित पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि.१० डिसेंबर रोजी वेद खिल्लार गोशाळा सांगली-कोल्हापूर बायपास रोड निमशिरगाव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी कालभैरव यज्ञ,प्रसाद दुपारच्या सत्रात गोपालक व शेतकऱ्यांसाठी,सर्वांसाठी अभय भंडारी यांचे मार्गदर्शन,कृषी शिबीर व शेतकऱ्यांना निःशुल्क गोकृपा अमृत मूळ जिवाणूंचे वाटप,पंचगव्य नैसर्गिक चिकित्सकांचे मंथन सत्र,स्वदेशी प्रदर्शन,नैसर्गिक उत्पादनांचे स्टॉल,तसेच गोपालकांसाठी लागणारे साहित्य,ग्रामोद्योग व गृह उद्योग तसेच पंचगव्य उत्पादनांचे स्टॉल व नैसर्गिक औषधोपचार उपलब्ध असणारा स्वदेशी प्रेरणा दिवस लाभ घ्यावा असे आवाहन वैद्य गव्यर्षी नितेश ओझा यांनी केले आहे.

Spread the love
error: Content is protected !!