स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचे इचलकरंजीत पडसाद

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे
यांचे पुत्र आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे सुरू झालेला वाद चांगलाच पेटला आहे.कर्नाटक विधानसभेच्या दालनातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तैलचित्र काढून टाकण्यात यावे,असे अवमानजनक विधान प्रियांक खर्गे यांनी केले होते.

या वादग्रस्त वक्तव्यविरोधात प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अरविंद माने प्रमुख उपस्थितीत भाजप नेते,कार्यकर्ते रस्तावर उतरले आहेत.

कर्नाटकचे काँग्रेसचे मंत्री प्रियांक खर्गे यांच्याविरोधात इचलकरंजी शहरात जोरदार घोषणाबाजी करत खर्गे यांची प्रतिकात्मक पुतळ्याचीअंत्ययात्रा काढून जोडो मारो आंदोलन करण्यात आले.यावेळी आंदोलकांनी खर्गे,राहुल गांधी यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्याविरोधातही घोषणा दिल्या.

शहरातील महात्मा गांधी पुतळा चौकात भाजप युवा मोर्चा भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. यावेळी रवी घोरपडे,अरविंद चौगुले,प्रवीण पाटील,उमाकांत दाभोळे,राजू भाकरे यांच्यासह भाजपा युवा मोर्चा भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!