अन्यथा खासदार आमदारांचा कार्यक्रम उधळून लावू – काँ.आप्पा पाटील

कुरुंदवाड / प्रतिनिधी

राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आपल्या मानधनवाढ व इतर मागण्यांसाठी ४ डिसेंबरपासून संपावर आहेत. मात्र सत्ताधारी पक्षाचे खासदार धैर्यशील माने व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व आमदार विनय कोरे यांनी याबातीत ठोस आवाज उठवला नाही.तसेच वारंवार पाठपुरावा करून सुद्धा मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ रविवार दि १० डिसेंबर रोजी कार्यक्रमास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी कुरुंदवाड येथे उपस्थित राहणार आहे.येणाऱ्या लोकप्रतिनिधीना काळे झेंडे दाखवून निदर्शने करणेत येणार असल्याचा इशारा कॉ आप्पा पाटील व कॉ जयश्री पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिला.लोकप्रतिनिधी म्हणून ठोस भूमिका घ्यावी अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कॉ पाटील यांनी दिला.या पत्रकार बैठकीस कॉ.आप्पा पाटील, कॉ.जयश्री पाटील, कॉ.शोभा भंडारे,सौ.अंजली क्षीरसागर, सौ.दिलशाद नदाफ,शमा पठाण उपस्थित होत्या.

अंगणवाडी युनियनचा प्रमुख मागण्या

1. सर्वोच्च न्यायालयाच्या CIVIL APPEAL NO. 3153 OF @ SLP [CIVIL] No. 30193 of 2017) मधील २५ एप्रिल रोजी ग्रॅच्युईटीबाबत दिलेल्या अंतिम निकालाची अमंलबजावणी करावी.त्यात म्हटल्यानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदे ही वैधानिक पदे असून त्यांना मिळणारा मोबदला हा वेतनच आहे. तरी त्यानुसार त्यांना शासकीय कर्मचारी घोषित करून त्या अनुषंगाने येणारी वेतन श्रेणी / ग्रॅच्युईटी / भविष्य निर्वाहनिधी आदि सामाजीक सुरक्षा, इत्यादी सर्व लाभ देण्यात यावेत.

2) अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविकाना दरमहा २६००० रुपये व मदतनिसाना २००००/- रुपये दरमहा मानधन देण्यात यावे.

3) मानधन वाढले तरी महागाई त्याच्या दुपटीने वाढल्यामुळे ते कमीच पडते. तरी महागाई निर्देशांकाला जोडून दर सहा महिन्याने मानधनात महागाई निर्देशांकानुसार वाढ करावी.

4) मा महिला व बालविकास मंत्र्याशी चर्चा झाल्यानुसार विमा योगदान मासिक निर्वाह भत्ता (पेन्शन) सेवा समाप्ती नंतर देण्याचा प्रस्ताव मा. मंत्र्यांनी मान्य केल्या प्रमाणे नोव्हेंबर अखेर पर्यंत तयार करून तो हिवाळी अधिवेशनात मंजूर करवून घ्यावा.

5) महानगरपालिका हद्दीत जागेचे निकष शिथिल करून अंगणवाड्यासाठी रू.५००० ते ८००० भाडे मंजूर करावे.

6) आहाराचा ८ रुपये दर अत्यल्प असून त्यामुळे कुपोषण निर्मुलन होण्या ऐवजी उलट त्यात वाढ होत आहे.तरी हा दर सर्वसाधाराण बालकांसाठी १६ व अतिकुपोषित बालकांसाठी २४ रू असा करावा.

Spread the love
error: Content is protected !!