सुदृढ बैल,गाय,म्हैस व ट्रॅकवर श्वान पळविणे स्पर्धा उत्साहात

श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुसानिमित्त

अविनाश पाटील यांची बैलजोडी राजेंद्र चव्हाण यांची गाय तर महेश देंडे यांचा गौरा श्वान प्रथम प्रथम

शिरोळ / प्रतिनिधी

सोमवारपासून सुरू असलेल्या शिरोळचे ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुसानिमित्त गुरुवारी सुदृढ बैलजोडी उत्कृष्ट गाय देशी घोडा खोंड संकरित गाय मुरा म्हैसाना आणि पंढरपुरी म्हैस आणि ट्रॅकवर श्वान पळविणे या स्पर्धा उत्साहात पार पडल्या.या स्पर्धेत राजेंद्र चव्हाण यांची देशी गाय तर अविनाश पाटील यांची बैलजोडी व महेश देढें यांचा गौरा श्वान प्रथम आला.
श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुसानिमित्त येथील श्री बुवाफन महाराज मंदिरासमोरील मैदानात सुदृढ बैलजोडी उत्कृष्ट देशी गाय देशी घोडा बिनदाती खोंड संकरित गाय मुरा/म्हैसाना व पंढरपुरी म्हैस यांच्या स्पर्धा पार पडल्या विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व शिल्ड आणि चषक पारितोषिक म्हणून मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले .या स्पर्धेचे उद्घाटन गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे,धनंजय देसाई,विजय पाटील,नंदकुमार माणगावकर,कृष्णा लोहार, उमेश रावळ,शितल गायकवाड,रावसाहेब माने, पत्रकार डी.आर पाटील,राजेंद्र माने,युवानेते पृथ्वीराज यादव,विजय आरगे,संजयसिंह यादव, प्रफुल कोळी,अर्जुन बेंद्रे,धैर्यशील जाधव,श्रीपती माने,बाजीराव पाटील,प्रमोद पाटील,प्रदीप चव्हाण,किरण शिंदे,राजाराम फल्ले यांच्यासह मान्यवर आणि प्राणी प्रेमी व शेतकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन करत आणि परीक्षक म्हणून डॉ. अशोक कोटगिरे,विनायक पाटील,आदेश गावडे, सतीश खराडे,सुरेश सावंत,विशाल माळी,दीपक कोळी,योगेश चुडमुंगे,प्रवीण गंगधर उदय गंगधर यांनी काम पाहिले.
स्पर्धा उत्साहात

सुदृढ बैलजोडी स्पर्धा – अविनाश तानाजी पाटील – रेंदाळ (प्रथम) , रामदास अण्णासो गायकवाड – सैनिक टाकळी (द्वितीय), सौरभ सुनील मुळे – शिरोळ (तृतीय).

उत्कृष्ट देशी गाय स्पर्धा- राजेंद्र सखाराम चव्हाण – कांडगाव (प्रथम), सागर विश्वास मोरबाळे – नुसिंहवाडी (द्वितीय), अक्षय विश्वास खोत – काकाचीवाडी (तृतीय)

उत्कृष्ट देशी घोडा स्पर्धा- सागर वडर – (प्रथम) संतोष पुंदे -(द्वितीय), अमोल कांबळे – (तृतीय).
उत्कृष्ट बिनदाती खोंड स्पर्धा- लक्ष्मण फलटणे – सदलगा (प्रथम) नैवमान चिकोडे – शिरोळ (द्वितीय) स्वराज्य संजय चव्हाण – कांडगाव (तृतीय)

उत्कृष्ट संकरित गाय स्पर्धा- सुशील दिलीप खोत – बागणी (प्रथम) शिवाजी संजय मदने – शेगाव (द्वितीय)

उत्कृष्ट मुरा/म्हैसाना म्हैस स्पर्धा- संजय चालके – (प्रथम) विनोद कोळी – (द्वितीय)

उत्कृष्ट पंढरपुरी म्हैस स्पर्धा- आण्‍णासो हराळे – मिरज (प्रथम) प्रशांत जाधव जानकास – शिरोळ (द्वितीय), संतोष माने – पंढरपूर (तृतीय)

शिरोळ येथील समतानगर येथे ट्रॅकवरील श्वान पळविण्याच्या स्पर्धा उत्साहात पार पडल्या ही शर्यत पाहण्यासाठी श्वान शर्यत शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ट्रॅकवरील श्वान पळविण्याच्या स्पर्धेत – महेश देढें ( गौरा) प्रथम, आर सी क्लब (डार्लिंग कृष्णा ) द्वितीय, गणोबाराया प्रसन्न गणेशवाडी (राया००७) तृतीय संदीप तोडकर बालिंगा (ऐश्वर्या) महालक्ष्मी प्रसन्न शिंगणापूर (पशुपती) महालक्ष्मी प्रसन्न कोल्हापूर (व्हीआय पी नागिन) जिगरी ग्रुप खानापूर(जोलेट) बापू रास्ते ढालेवाडी (विक्रांत) चंद्राताई बोरपाडळे (चुटकी) स्मार्ट बॉय लिंगनूर (पोलो) पिंटू घालवाड (जॅक्सन) दुधगाव (ब्रेव फॅन्सी) संयुक्त श्वान प्रेमी शिरोली (नेक्सा सिरीज) मसोबा प्रसन्न साबळेवाडी (मल्हार१२१२) बाळूमामा प्रसन्न वाळवा (ज्युनियर ब्लॅक सेंचुरी) या श्वानाना अनुक्रमे ४ ते १५ पर्यंतची उत्तेजनार्थ बक्षीस रोख रक्कम देण्यात आली.या स्पर्धेचे समालोचन धीरज पवार,कागदी मेकर गणेश शिंदे,पंढरपूर काढणी मेकर गणेश बुधावले लिंबवडे,खात्रीदार धीरज शिंदे,शिवराज पाटील, प्रताप जगदाळे यांच्यासह किरण जगताप. इंद्रजित कोळी,प्रविण जगदाळे,सतिष जाविर, विजय मसाळे,धिरज वैभव,यश,ओंकार,दिपक यांनी उत्कृष्ट नियोजन केले पद्माराजे विद्यालयाच्या मानधने क्रीडांगणावर बक्षीस वितरण व सत्कार समारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाला यानंतर अर्चना जावळेकर,किरण पुणेकर,संगीता लाखे, अस्मिता पुणेकर, नमिता पाटील, प्राची मुंबईकर, माया खुटेगावकर यांचा लावणी महोत्सव हा मनोरंजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला हा कार्यक्रम पाहण्यासाठी रसिक श्रोत्यांची मोठी गर्दी झाली होती.
श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूस साजरा करण्यासाठी उत्सव व उरूस संयोजन समितीचे आधारस्तंभ युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव,माजी ग्रामपंचायत सदस्य विजय आरगे,यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव व उरूस संयोजन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब जगदाळे,उपाध्यक्ष संतोष विटेकरी ,खजिनदार राहुल कोळी,सचिव किरण जगताप,ऑडिटर पिराजी जयान्नावर,स्वागताध्यक्ष पिराजी हेरवाडे,कार्याध्यक्ष संतोष घाडगे संयोजक लखन कुंभार,सहसंयोजक सागर कांबळे ,सहस्वागताध्यक्ष संजय जगदाळे,सहकार्याध्यक्ष संदीप कोळी,सहखजिनदार कुमार जयान्नावर,नितीन कोळी,सहऑडिटर प्रताप जगदाळे,सहसचिव गणेश मोरे यांच्यासह पवनपुत्र तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य मार्गदर्शक कार्यकर्ते विशेष यांनी विशेष परिश्रम घेतले .

Spread the love
error: Content is protected !!