शिरोळ / प्रतिनिधी
योगशिक्षिका डॉ भाग्यश्री वठारे यांनी जयसिंगपूर नगरीमध्ये सुरू केलेले श्रीयुग योगा क्लासेस हे म्हणजे निरोगी आणि आरोग्यसंपन्न आयुष्याची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन स्वरूपा राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी व्यक्त केले आहे.
जयसिंगपूर येथे श्रीयुग योगा क्लासेस शाखेचा शुभारंभ पाटील-येड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.सदर कार्यक्रमाप्रसंगी शिरोळ नगरपरिषद मुख्याधिकारी निशिकांत प्रचंड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी माजी मुख्याध्यापक तथा अनुभव संपन्न योगशिक्षक विठ्ठलराव मुसाई यांनी योगशास्त्रातील विविध संकल्पना अतिशय सखोलपणे मांडून दैनंदिन जीवनातील योगाचे महत्त्व उपस्थितांच्या समोर विशद केले.
आनंदी जीवनशैली आणि सकारात्मक ऊर्जा यांचा मेळ घालून दीर्घायुष्य जीवन वाटचालीसाठी या योगदालनाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वपूर्ण आणि मार्मिक पद्धतीने मार्गदर्शन होणार असल्यामुळे सर्वांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी दामाजी न्यूज सीईओ प्रतीक भगरे,सिव्हिल अभियंता सचिन वठारे,डॉ सिद्धार्थ साठे त्याचबरोबर जे जे मुगदूम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज जयसिंगपूर या वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर-कर्मचारी आणि विद्यार्थी व इतर नागरिक तसेच योगप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.